Believe आणि Trust चा अर्थ ‘विश्वासच‘!

पण खरा चमत्कार हाच आहे, की रोज तो आपल्याला नवीन करकरीत कोरा दिवस देतो आणि आपल्या गतचुकांमधून शिकण्यासाठी आणि नवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी. आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला आपला परमेश्वर आपल्यासोबत असतोच आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच, हा विश्वास असला तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
Believe म्हणजे विश्वास… आणि Trust म्हणजे पण विश्वास. दोन्ही शब्दांचा अर्थ “विश्वासच” आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे, एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मध्ये केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबलवरून या इमारतीवरून त्या इमारतीवर जात होता. त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता. दोन इमारतींच्या मध्ये हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पाहत होती. हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं. जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या, तोंडभरून कौतुक केले.
तो इमारतीच्या खाली लोकांमध्ये आला. लोक त्याच्याबरोबर फोटो, सेल्फी काढू लागले. त्याचं अभिनंदन करू लागले. तो डोंबारी सगळ्यांना उद्देशून म्हणाला, मला हे पुन्हा एकदा करावंसं वाटतं. तुम्हाला विश्वास वाटतो, का मी हे पुन्हा करू शकेन? सगळी माणसं एक आवाजात म्हणाली हो, तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस.
डोंबारी म्हणाला, “तुम्हाला विश्वास आहे ना, मी हे परत करू शकेन? पुन्हा सगळे ओरडले, हो हो आम्हाला विश्वास आहे तू पुन्हा हे नक्कीच करू शकशील. तुम्हाला नक्की विश्वास आहे ना?
हो, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू खात्रीने करू शकशील.
डोंबारी म्हणाला, “ठीक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी
मला तुमचा मुलगा द्या, मी त्याला खांद्यावर घेऊन या केबलवरून चालतो. जमावामध्ये एकदम शांतता पसरली. सगळे चिडीचूप झाले.
डोंबारी म्हणाला, ‘काय झाले. घाबरलात का? अरे आताच तर तुम्ही म्हणालात ना, की माझ्यावर पूर्ण विश्वास
आहे म्हणून?’
तात्पर्य : जमावाने जो डोंबार्यावर दाखवलेला विश्वास हा Believe आहे. Trust नाही.
तसेच हाच भ्रम सगळ्यांना आहे, परमेश्वर आहे. पण परमेश्वराच्या सत्तेवर विश्वास नाही. परमेश्वरावर विश्वास असेल तर चिंता आणि ताण-तणाव कशाला हवेत. त्याच्या नामाने दगड तरले तर आपण का नाही तरणार? परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट पाहत बसतो. पण खरा चमत्कार हाच आहे, की रोज तो आपल्याला नवीन करकरीत कोरा दिवस देतो आणि आपल्या गतचुकांमधून शिकण्यासाठी आणि नवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी. आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला आपला परमेश्वर आपल्यासोबत असतोच आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच हा विश्वास असला तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.