त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हळदीचे होतात फायदे

आपण जेवणात वापरत असलेली हळद भाज्यांना तर रंग देतेच, शिवाय ती आरोग्यालाही खूप उपयोगी आहे. हळदीमधील अँटिबॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे चेहर्‍यावरील पिंपल्स आणि काळे डाग कमी होतात.

तेलकट त्वचेच्या लोकांसाठी हळद गुणकारी आहे. यासाठीच भारतीय लग्नसमारंभात वर आणि वधूला हळद लावण्याची प्रथा आहे. हळद लावण्याचा विधी लग्नसोहळ्यात फार पवित्र मानला जातो.


हळदीचा फेसपॅक कसा कराल ?
हळदीमध्ये दूध, बेसन आणि मध टाकून एक पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहर्‍यावर लावा. सुकल्यावर चेहरा स्वच्छ करा. या फेसपॅकमुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते.

त्वचेवर ग्लो येण्यासाठी
हळद, ताजी साय, गुलाबपाणी यांचा फेसपॅक चेहर्‍यावर लावा आणि काही मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. ज्यामुळे चेहर्‍यावर इन्स्टंट ग्लो येतो.

चेहर्‍यावर उजळपणा येण्यासाठी
बेसन, दही, हळद पावडर आणि पाणी एकत्र करून चेहर्‍यावर लावा. सुकल्यावर चेहरा धुवून टाका. असे नियमित केल्यास तुमचा चेहरा नितळ आणि फ्रेश दिसेल.

त्वचेवरील डाग कमी होण्यासाठी
सतत बदलणारे हवामान आणि प्रदूषण यामुळे तुमच्या चेहर्‍यावर काळे डाग पडतात. कधीकधी पिंपल्समुळेदेखील चेहर्‍यावर काळे डाग दिसू लागतात. या काळ्या डागांना दूर करण्यासाठी हळद एक उत्तम उपाय आहे. यासाठी दोन चमचे हळद आणि चमचाभर दूध एकत्र करून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावून वीस मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. महिन्यातून एकदा अथवा दोनदा हा उपाय करून तुम्ही तुमच्या चेहर्‍यावरील डाग कमी करू शकता.

चेहर्‍यावरील केस कमी होण्यासाठी
चेहर्‍यावरील केस दिसू नयेत यासाठी तुम्ही ब्लिचिंग करता. मात्र सतत ब्लिचिंग केल्यामुळे त्यातील केमिकल्समुळे तुमच्या चेहर्‍याचे नुकसान होऊ शकते. शिवाय चेहर्‍यावरील केस कमी करण्यासाठीदेखील हळद तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. यासाठी हळदीत नारळाचं कोमट तेल टाकून एक फेसपॅक तयार करा. चेहर्‍यावर हा फेसपॅक लावा आणि काही मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. नियमित असे केल्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील केसांची वाढ कमी होण्यास मदत होईल.

चेहर्‍यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी
हळद, दूध आणि मध एकत्र करून चेहर्‍यावर लावल्यामुळे तुमच्या चेहर्‍यावर नैसर्गिक चमक दिसू लागेल. दहा ते पंधरा मिनिटे हा फेसपॅक चेहर्‍यावर ठेवा. त्यानंतर हाताच्या बोटांनी हलका मसाज करून कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. त्वचेसाठी आपणही हळदीचा उपयोग अवश्य करा.

admin: