ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

तुषार दोशींची तीनच दिवसात दुसऱ्यांदा बदली

पुणे | Pune News : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना (Jalna) येथे झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेने चर्चेत असलेले जालन्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांची पुणे लोहमार्ग अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. नुकतेच दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली होती. त्यानंतर गृह विभागाने तीनच दिवसात निर्णय फिरवला आहे.

राज्य गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी बदलीचे आदेश काढले. जालन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दोशी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. दोशी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. दोशी यांची सीआयडीच्या अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आल्यानंतर विरोधकांनी टीका केली होती.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानंतर दोशी यांची लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

image 3 18

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये