नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात, दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू
जुन्नर | पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून (Junnar) धक्कादायक बातमी समोर येत आहे. जुन्नरच्या ओतूर (Otur) परिसरात भीषण अपघात झाला असून त्यात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ओतूर जवळ असणाऱ्या कोळमाथा येथे झाला आहे. या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे.
कल्याण-नगर महामार्गांवर (Kalyan-Nagar Highway) ओतूर जवळील कोळमाथा नामे शिवारात एसटी बसला दुचाकीची जोरदार धडक बसून आणि त्याच बरोबर पिकअप गाडी अपघात वाचवताना खड्ड्यात जाऊन पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नामदेव बांबळे घटनास्थळी तातडीने पंचनामा करण्यासाठी पोहोचले होते. मात्र हे अपघाताचे सत्र सुरू असल्यामुळे नगर – कल्याण महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.