मावळ भाग, धरण क्षेत्र भाग व इतर सर्व काही भागात गेले पाच-सहा दिवस संतत पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन काल दि. २५ रोजी आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला होता. नदीकाठच्या जवळील धर्मशाळेत, घरा मध्ये नदी पात्राचे पाणी शिरले होते. चार ही पुल रहदारी साठी बंद ठेवण्यात आले होते.
आज दि.२६ रोजी नगरपरिषद चौका समोरील नवीन पुल व चाकण चौक जवळील हे दोन पुल वाहनांच्या रहदारी साठी चालू करण्यात आले आहेत. तर नगरपरिषद चौकासमोरील जुन्या पुलावर पुरा मुळे रस्त्यावर गाळ साचलेला असून त्याची स्वच्छता आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल व पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत सकाळी सुरू होती.तेथील स्वच्छता पूर्ण झाल्या नंतर तो पुल सुद्धा रहदारी करीता खुला करण्यात येणार आहेव सिद्धबेट बंधाऱ्या जवळील पुल नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्यात आला आहे.
सिद्धबेट बंधाऱ्या जवळ इंद्रायणी नगरच्या (हवेली) बाजूने पुरा मुळे काहीशा रस्त्या वाहून गेला असून त्या बंधाऱ्या लगत (रस्ता लगत) खड्डा पडला आहे.नदी काठचे नागरिकांच्या सुरक्षेत साठी बसवण्यात आलेले लोखंडी ग्रील त्याभागतील वाहून गेले आहेत.तसेच पुरामुळे दोन विजेचे खांब नदी पात्रात पडलेले आहेत. सिद्धबेट बंधाऱ्या जवळील पुलावरील लोखंडी ग्रीलला काहीश्या प्रमाणात जलपर्णी व लाकडी पुठ्ठे इतर वस्तू अडकल्याचे दिसून येत होते.