ताज्या बातम्यादेश - विदेश

मोठी बातमी! जम्मू दुहेरी बाॅम्बस्फोटने हादरलं, 6 जण गंभीर जखमी

श्रीनगर | J&K Blast – जम्मू दुरेही बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. जम्मू (Jammu) शहरातील नरवाल (Narwal) भागात आज दुपारच्या सुमारास एकमागून एक असे दोन शक्तीशाली स्फोट झाले आहेत. या घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एनएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आज दुपारच्या सुमारास जम्मू शहरातील नरवाल भागात दोन बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकेबंदी केली आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतली नसल्याची माहिती जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये