Top 5इतरताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज दोन तासांचा ब्लॉक, ‘ही’ आहेत पर्यायी मार्ग

Pune-mumbai expressway :

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वरती आज (10 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 2 या वेळात पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे एक्सप्रेसवे वरती दिशापालक बसवण्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने दिलेल्या माहिती नुसार जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरु असणार आहे.

अमृतांजन पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे म्हणजे किलोमीटर ४५ आणि ४५.८०० किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. या कामावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार असून तर हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहे.

मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक २ तासांसाठी बंद असली, तरी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असणार आहे. फक्त कारसाठी जुना पुणे – मुंबई (Pune-mumbai expressway) महामार्ग शिंग्रोबा घाटातील सुरू राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये