क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

न्यूझीलंडचा लाजिरवाणा पराभव! किवीला हरवून UAE ने रचला इतिहास

UAE vs New Zealand 2nd T20 : गेल्या आठवड्यातच वेस्ट इंडिजने टी-20 मालिकेत भारताचा 3-2 असा पराभव करून दहशत निर्माण केली होती. आता क्रिकेट विश्वात एक मोठा चमत्कार घडला आहे. संयुक्त अरब अमिरातीने टी-20 सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे.

फिरकीपटू अयान अफझल खानच्या घातक स्पेलच्या जोरावर यूएईने न्यूझीलंडला अवघ्या 142 धावांवर रोखले आणि त्यानंतर कर्णधार मोहम्मद वसीमच्या स्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने अवघ्या 16 षटकांत हे लक्ष्य गाठले. यासह यूएईने न्यूझीलंडविरुद्ध प्रथमच कोणत्याही फॉरमॅटमध्ये विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

या पराभवासोबत न्यूझीलंडच्या नावावरही एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये एसोसिएट टीमकडून पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून UAE ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मार्क चॅपमनच्या (63) अर्धशतकाच्या जोरावर किवी संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 142 धावांपर्यंत मजल मारली. चॅपमन व्यतिरिक्त न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला 25 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. यजमानांकडून अयान खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये