बीड : (Uday Aaher On Eknath Shinde) पाच महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी 40 आमदार आणि 13 खासदारांसह सर्व शिवसेना पक्षच फोडला. त्यानंतर शिंदे गटात रोजच होणाऱ्या इनकमिंगने त्यांचे समाधान होताना दिसत नाही. त्यामुळेच की काय शिंदेंकडून दोन महिन्यापुर्वी कार आपघात निधन झालेल्या दिवंगत विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना फोडण्याचा विडा उचलण्यात आला आहे का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून रोजच शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटातील शिवसेना फुटून एकनाथ शिंदे गटासोबत जात असल्याचे दिसत आहे. मात्र आता शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांचे सहकारी, पक्षातील तरुण चेहरा म्हणून ओळखे जाणारे शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी पक्षाला राम राम करण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरचं शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राममध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. फक्त शिवसंग्रामच नाही तर इतरही मराठा समाज आणि बारा बलुतेदार समाजासाठी विनायक मेटे यांचा आधार होता. शिंदे-फडणवीस यांच्याकडून मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना ताकत देवून त्यांच राजकीय पुनर्वसन करतील असं वाटत असतानाच, आता त्यांनाच मोठा दणका देण्याचा प्लॅन शिंदेंनी अखल्याचे दिसून येत आहे.
विनायक मेटे यांच्या जाण्याने शिवसंग्राम पक्षात फुट पडणार त्यामुळे आता पक्षात कोणते नेते राहतात हे पाहवं लागणार आहे, दरम्यान शिवसंग्राम मधील जवळपास 90 टक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणार आहे. ही माहिती उदय आहेर यांनी दिली आहे.