ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मंत्री उदय सामंतांना धक्का? भावाच्या स्टेट्सला ठाकरेंची मशाल, चर्चेला उधाण..

Uday Samant Brother Kiran samant whatsapp status : शिंदे गटातील महत्त्वाचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचे खांदे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भावाने ठेवलेल्या व्हॉट्स अप स्टेट्सने खळबळ उडाली. किरण सामंत यांचे नाव आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत आहे. त्यातच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मशाल व्हाट्स स्टेट्सला ठेवलं. इतकंच नाही, तर जो होगा, देखा जायेगा असंही म्हटलं आहे.

दरम्यान, किरण सामंत यांच्या या हाॅट्सअप स्टेट्समुळे रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवाय यामुळे उदय सामंत यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रामदार कदम अन् तानाजी सावंत यांच्यातील वाद पडद्यामागे घडल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या प्रकरणाला चार दिवस उलटले नासतानाच हा प्रकार समोर आला आहे.

उदय सामंत यांचे बंधू आणि उद्योजक किरण सामंत यांनी व्हॉट्स अॅपवर स्टेट्स ठेवलं आणि नंतर डिलीट केलं. पण, यामुळे शिंदे गटात सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकांना आणखीन जवळपास वर्षे बाकी आसतानाच हा नाद उफाळुन येत आहे.

या स्टेट्सने खळबळ उडाल्यानंतर किरण सामंत यांनी ते डिलीट केले. त्यानंतर ते म्हणाले, “उद्योगमंत्री उदय सामंत यांचं करिअर बाद होऊ नये म्हणून स्टेट्स मागे घेतलं. बेलगाम बोलत आहेत त्यांच्यासाठी हे स्टेट्स होतं.” किरण सामंत यांनी स्टेट्स ठेवलं. नंतर ते डिलीट केलं. त्याचबरोबर खुलासाही केला. पण, त्यांच्या एका कृतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये