एकनाथ शिंदेंना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे का? उदय सामंत म्हणाले…

पुणे : (Uday Samant On Press Conference) एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह बंडखोरी वेगळा गट तयार केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. बंडाळी करुनही एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर सर्व आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत, असा दावा करत आहेत. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे, त्यांना धनुष्यबाण चिन्ह बळकावयाचं आहे, असे अनेक आरोप-प्रत्यारोप राजकीय वर्तुळात केले जात आहेत. या आरोपांवर बंडखोर आमदार उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. ते पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
संबंधित प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी कुठंही सांगितलं नाही की, मला शिवसेना ताब्यात घ्यायची आहे, मला शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह ताब्यात घ्यायचा आहे, मला पक्षप्रमुख व्हायचं आहे. त्यामुळे हा गैरसमज व्हायला नको. आमच्या ५० आमदारांसोबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी अशी कुठंही चर्चा केलेली नाही, हे कुणीतरी केलेलं षडयंत्र आहे, असं सावंत म्हणाले.