ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिवाजी महारांजावरील वादग्रस्त विधानानंतर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले ”हे पद कोश्यारी यांना झेपत नसेल, तर…”

सातारा : (Udayanraje Bhasale On Bhagarsinh Koshyari) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. याच विधानांमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून राज्यपालांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपाने राज्याची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, आता या सर्व वादावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करण्याऐवजी महाराजांचा इतिहास वाचला तर चांगले होईल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकवेळा वेगवेगळी विधानं करण्यात आलेली आहेत. या लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली असावी. म्हणूनच यांना विस्मरण होत असावे. अशी विधानं करणाऱ्यांमध्ये विकृती असावी. कदाचित त्यांचा अंतही होऊ शकतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“वादग्रस्त वक्तव्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. राज्यपाल हे पद मोठे आहे. हे पद कोश्यारी यांना झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा,” असेही उदयनराजे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये