शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्या नव्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा!

मुंबई : (Uddhav Thackeray congratulates On Chief Minister and Deputy Chief Minister) गुरुवार दि. ३० रोजी सकाळी एकनाथ शिंदे हे गोव्यातून मुंबईला आल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला. फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपचं शिष्टमंडळ आणि शिंदे गटातील एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर सायंकाळी एकटे एकनाथ शिंदे हे शपथ घेणार असून मी सरकार बाहेर राहून लक्ष ठेवणार असं देवेद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर सांगितलं.
पहिल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आतच एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या नवनियुक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.