“न्याय आपल्यालाच मिळणार…”, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई | Maharashtra Political Crisis –आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी होत आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी होतेय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. याच दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ या आपल्या निवासस्थानी शिवसैनिकांशी संवाद साधला. “सर्वोच्च न्यायालयात दुसरी केस सुरु आहे. माझा आई भवानी आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कोणी किती अफजलखान आले तरी मला त्याची परवा नाही. आत्ताचं वातावरण भारावून टाकणारं आहे. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झाली आहे. मी तुळजाभवानीच्या दर्शनाला येणारच आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाही. ज्या क्षणी मी ‘वर्षा’ सोडून ‘मातोश्री’त आलो तेव्हापासून असे शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता. दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने एक मिळावा इथेच झाला असता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.