ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘महाराष्ट्र प्रेमींचा, महाराष्ट्र द्रोह्यांविरुद्ध हल्लाबोल’! महाविकास आघाडीकडून मोर्चाचे टिझर रिलीज

मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, महापुरुषांचा अपमान तसेच बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवर मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली या मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यानंतर आता या मोर्चाचे टिझर महाविकास आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने मुंबईत शनिवार दि. १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या मोर्चात महाविकास आघाडीसह घटकपक्षही सामील होणार आहे. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात जो काही कारभार सुरु आहे. यामध्ये महापुरुषांबाबत अपशब्द वापरण्याचं काम सुरु आहे. त्यांना कोणी आवरही घालत नाही. यावरुन जनतेच्या मनात आक्रोश असल्याचं दिसून येत, असं महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या टीझरमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, यांची विधानं दाखवण्यात आली आहे. तसेच महापुरुषांचा अवमान सहन का करायचा, असा सवालही टीझरमधून उपस्थित करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये