ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

दिल्लीतून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना दिलासा? पक्षाचं नाव, चिन्ह वापरण्यासाठी परवानगी

नवी दिल्ली : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर तब्बल नऊ महिने सुनावणी सुरू होती. या कोर्टाच्या निकालावर देशाचं लक्ष लागून आहे. मात्र या निकालावर कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही की निकाल कसा लागेल. निवडणूक आयोगाच्या निकालावर उद्धव ठाकरे प्रचंड निराश झाले, निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं.

निवडणुक आयोगाच्या या निकालानंतर ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला निवडणुक आयोगाने तात्पुर्ते पक्ष आणि पक्षाचं नाव दिले होते. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह मिळालं होतं तर ते वापरण्याची मुदत सोमवारी 27 मार्चला संपतेय. तरी देखील अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पक्षाला दिलेलं नाव आणि चिन्ह सुप्रीम कोर्टात निकाल येईपर्यंत वापरता येणार आहे. अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेंच्या विरोधात गेला तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणायची शक्यात आहे. निकाल ठाकरेंच्या विरोधात गेल्यावर काय होईल या प्रश्नाचं उत्तर देताना कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, ठाकरे गटासमोर दोन बाबी असू शकतात. एक म्हणजे ठाकेर गटाला निकाला विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करून दाद मागता येऊ शकते, आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगात जाऊन नवीन नाव, नवीन चिन्ह घेऊन निवडणुकांना सामोरे जाणे येवढाच मार्ग ठाकरे गटा समोर असू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये