ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

वेळ, वार अन् तारीख ठरली! लवकरच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार..

ठाणे : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. नुकताच ठाकरे यांनी दोन दिवशीय विदर्भ दौरा केला. त्यानंतर आता ठाकरेंची तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या ठाणेच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. उद्या शनिवार दि. 22 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता शिवसेना ठाण्यात उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षाची मोठी पडझड झाली आहे. आता सावरायचे जरी म्हणले तरी शिवसेनेसाठी तेवढेसे सोपे असणार नाही. मात्र मागील काही दिवसांपासून पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. विदर्भ दौरा, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुखांच्या बैठकांचा सपाटा संपल्यानंतर आता शिवसेनेकडून ठाण्यात उत्तर भारयींच्या मतांवर डोळा ठेवून त्यांचा मेळावा घेतला जाणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथे उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात हा मेळावा घेण्याचे नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जैन आणि गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.

मुंबई-ठाण्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हा ठाण्यातील उत्तर भारतीय मेळावा महत्त्वाचा असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये