“दिल्लीला कसं पाणी पाजायचं हे…”; उद्धव ठाकरेंचा भाजप नेतृत्त्वावर निशाना
मुंबई : (Uddhav Thackeray On Narendra Modi) मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटर येथे आज सहा ऐतिहासिक पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची एकत्र उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीला कसं पाणी पाजू शकू हे आपण शिकायला हवं. महाराष्ट्रात ज्यांचा जन्म होतो, त्या रक्तात शिवप्रेम भिनलेलं असतं. समाजाला उपयोग होईल, असं पुस्तक प्रकाशन करायला धाडस लागतं, असं म्हणत लेखकांचेही त्यांनी कौतुक केले.
पुढे ठाकरे म्हणाले, किल्यांबाबत बोलताना माझा वेगळा अँगल आहे. मला वाटल की आकाशातून किल्ला बघावा. इतरांना भुगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहास आहे. भूगोलाचा वापर इतिहासात कसा केला गेला, हे पाहण्याची मला उत्सुकता होती. किल्ल्यांसाठी कशा जागा निवडल्या, त्यांची बांधणी कशी झाली, हे विषय माझ्या मनात आजही जिवंत आहेत.
राजगडाचे मी फोटो काढले होते. ते झाल्यावर किल्याभोवती उड्डाण केलं तर तटबंदी कशी बांधली असेल, असे अनेक प्रश्न मला पडले, किल्ला बोलायला लागले तर काय होईल, हे वैभव खूप छान आहे. मला नेहमी वाटत या किल्ल्यांना काहीतरी बोलायचं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.