ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

”भाजप पाकिस्तानी खेळाडूंवर फुलांचा वर्षाव करत असेल तर, मी शिवसेना म्हणून…”, उद्धव ठाकरे थेट बोलले

मुंबई : (Uddhav Thackeray On Narendra Modi) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाने कंबर कसली आहे. त्यासाठी छोट्या-मोठ्या पक्षासोबत जुळवा-जुळव करणे चालू आहे. नुकतीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि समाजवादी पक्षाची युती झाली आहे. त्या अनुसंघाने वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक रविवारी संपन्न झाली. समाजवादीसह वेगवेगळ्या २१ पक्षांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे गटाने पुढची रणनीती आखली आहे. शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेची पहिली निवडणूक १९६८ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाशी युती करुन लढली होती. १९७३ मध्ये महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाच्या रा.सू. गवई गटाशी आघाडी केली होती.

आता शिवसेना (उद्धव ठाकरे गट) समाजवादी पक्षासोबत जात आहे. या संयुक्त बैठकीमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला सणसणती उत्तर दिलं. राज्यातले भाजप, शिवसेना नेते आणि केद्रातल्या भाजप नेत्यांवर त्यांनी आसूड ओढला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जसा आहे तसा आहे, स्वीकारा अथवा नाकारा. आज २१ पेक्षा जास्त पक्ष माझ्यासोबत आले हे भाग्य आहे. लढाई ही विचारांशी असते व्यक्तींशी नसते. त्यामुळे आपल्याला विचारांचा लढा पुढे न्यायचा आहे.

”आजही मला लाडके माजी मुख्यमंत्री म्हणतात, मला कुटुंबप्रमुख असल्याचा आनंद वाटतोय. समाजवादीसोबत आम्ही आलो आहोत तर तिकडचे लोक असं झालं, तसं झालं म्हणतील. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी क्रिकेटवर फुलांचा वर्षाव भाजप करत असेल तर शिवसेना म्हणून मी समाजवाद्यांशी का बोलू शकत नाही?”

ठाकरे पुढे म्हणाले, समाजवादीतले लोक काय देशाबाहेरुन आले आहेत का? आमचे मतभेद होते, ते आम्ही गाडून टाकले आहेत, तुम्हाला काय करायचंय? देशावर प्रेम करणारे मुस्लिम सोबत आले तर पोटात दुखण्याचं कारण काय? असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये