मुंबई : (Uddhav Thackeray On Prakash Ambedkar) मागील काही दिवसापासून ठाकरे-आंबेडकर युतीच्या चर्चेला आज अखेर पुर्णविराम मिळाला आहे. रामदास आठवले यांच्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, राज्याच्या राजकारण याचा नक्कीच परिणाम हे नक्की असल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान, यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्यामुळे शिवसेनेला युतीसाठी होकार कळवला असल्याची माहिती त्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी मुंबईत प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याला अर्पण करण्यात आलेली, प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते.