ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उद्धव ठाकरे, संजय राऊतांना जामीन मंजूर

राहुल शेवाळे बदनामी प्रकरण

मुंबई | Maharashtra Politics – शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या बदनामी प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मंजूर करण्यात आला. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोमवारच्या सुनावणीसाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी असलेले संजय राऊत यांनी कोर्टात स्वतः हजेरी लावली होती. यानंतर या दोघांनी आपला जामीन अर्ज कोर्टापुढे सादर केला. त्यानंतर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर या दोघांना ही जामीन मंजूर करण्यात आला. या पुढची सुनावणी ही १४ सप्टेंबर रोजी होणार असून त्या वेळीही या दोघांनाही हजेरी लावावी लागेल.

उद्धव ठाकरे हे राज्यातील अतिमहत्त्वाचे व्यक्ती आहेत, तसेच त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्यापासून सूट देण्यात आली. पुढच्या सुनावणीवेळीही उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती लावतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये