ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई : (Uddhav Thackeray will tour Maharashtra) मागील महिनाभरात राज्यात खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड करुन वेगळा गट तयार केला. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचून, त्यांच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या आमदारांनी ठाकरे हे मंत्री, आमदारांना वेळ नसल्याच्या त्यावर आरोप झाला.

या पार्श्वभुमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. पक्षाला मजबुत करण्यासाठी ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत. राज्यभरातील ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेणार आहेत. शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी आणि पक्षाला बळकटी मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून पक्ष बळकट कसा करता येईल, याची पूर्ण खबरदारी घेतली आहे. ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तयारी आणि आखणी सध्या शिवसेना भवनात सुरु झाली असल्याची माहिती मिळत आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हा दौरा मुंबईतून सुरु होऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. येत्या काही दिवसात किंवा महिन्यात उद्धव ठाकरे हे पावसाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असल्याचं सांगण्यात येत आहे.      

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये