ताज्या बातम्यामनोरंजन

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट घेऊन येत आहे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म “अल्ट्रा झकास”

पुणे | गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. 1982 पासून मनोरंजन विश्वातील सर्वात अग्रगण्य ”अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट” तर्फे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म “अल्ट्रा झकास” लॉंच करण्यात आले आहे. याद्वारे प्रेक्षकांना दर्जेदार कंटेंट पाहण्याचा आनंद घेता येणार असून ओटीटी च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांसाठी नवंनवीन चित्रपट, टीव्ही शो, वेबसिरीज, पाककला, लहान मुलांचे माहितीपट आणि इतर व्हिडिओ असे अप्रतिम कंटेंट लायब्ररी उपलब्ध होणार आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गांव आले गोत्यात 15 लाख खात्यात’ आणि ‘रौद्र’च्या खास प्रीमियरची घोषणा केली आहे.

अल्ट्रा मीडियाचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, “आमचे नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा झकास’ लॉंच करण्यास उत्सुक आहोत, जे आमच्या प्रेक्षकांना उच्च- गुणवत्तेचा मनोरंजनात्मक कंटेंट उपलब्ध करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. खरंतर अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही आमच्या दर्शकांना एक अनोखा आणि मंत्रमुग्ध करणारा अनुभव देखील देत आहोत जोत्यांना इतरत्र कुठेही मिळणार नाही.”

अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी, रोमान्स आणि विविध शैलींमधील कंटेंटचा विस्तृत संग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्ट टीव्ही सहित सर्व प्रमुख उपकरणांवर उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर एका लॉगिन मध्ये 5 अकाउंट बनवण्याची मुभा असून त्या मध्ये प्रत्येका जवळ वॉच लिस्ट, पाहणे सुरू ठेवणे, डाउनलोड, स्मार्ट सर्च, शिफारस इ. वैयक्तिक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. महत्वाचे म्हणजे, तुमच्याकडे इंटरनेट नसतानाही तुमचा आवडता कंटेंट डाउनलोड करून, पसंतीच्या रिझोल्यूशन मध्ये पाहण्याचा आनंद मिळवू शकता. त्याचप्रमाणे स्टोरेज मॅनेज करण्याची सुविधा आहे.

अल्ट्रा झकास ची सर्व वैशिष्ट्ये प्रचंड सवलतीच्या दरा मध्ये लॉन्च ऑफर मध्ये 299 रुपये प्रतिवर्ष, म्हणजेच एक रुपयापेक्षा कमी प्रतिदिन सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध करून देत आहे. तसेच तीन महिन्यांसाठी हेच प्रीमिअर कंटेंट पाहायचे असल्यास 149 रुपयांमध्ये प्लॅन उपलबध आहे. सदस्यत्व नसलेल्या दर्शकांना काही प्रीमियम कंटेन्ट विनामूल्य पाहण्याची मुभा आहे. ‘अल्ट्रा झकास’ अॅप आता प्ले स्टोअरआणिअॅप स्टोअर वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. सदस्यत्व घेऊन, दर्शक आमच्या विशाल लायब्ररी मध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या कंटेंटची अनुभूती मिळवू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये