Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

भात लावणीचा चिखल बेतला बैलांच्या जीवावर, हरिश्चंद्रीमधील दुर्दैवी घटना!

पुणे | Two Bulls Die In Bhor – भात लावणीला  सुरूवात झाली असून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरिश्चंद्री या गावामध्ये भात लावणीसाठी चिखल करत असताना वीजेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने दोन बैलांचा मृत्यु झाला आहे. नशिबाने शेतकरी आणि त्यांचा सहकारी यामधून बचावले.

रमेश दत्तात्रय वाल्हेकर यांच्या शेतात भात लावण्यासाठी पाणी तुंबवण्यात आलं होतं. मात्र शेताच्या बांधाजवळ असलेल्या वीजेच्या प्रवाह पाण्यात उतरला, त्यावेळी बैल पाण्यात उड्या मारू लागले ही गोष्ट लक्षात येताच रमेश  वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे यांनी बैलांना जोखडातुन मुक्त करत वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बैलांना यामध्ये आपला प्राण गमवावा लागला.

शेता शेजारील विद्युत खांबावरील सर्व्हिस वायर ब्रेक झाल्याने खांबा मध्ये विद्युत प्रवाह उतरला त्यामुळे ही दुर्घटना घडली असुन या बाबत अहवाल विद्युत निरीक्षक यांना पाठवला असुन शेतकऱ्याला जास्ती जास्त मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती विज वितरण कंपनीचे उपअभियंता घाटुळे यांनी दिली.

दरम्यान, विजेच्या खांबावरील शार्टसर्किटमुळे दोन्ही बैलांचा मृत्यु झाला असुन त्यांची अंदाजे किंमत 1 लाख 80 हजार रुपये असल्याची माहिती समजत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये