क्राईमताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘अश्लील’ व्हिडीओ मागचे नेमके सत्य काय? केंद्राने घेतली दखल

Rashmika Mandanna Viral Video : श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचं कारण रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हा व्हिडीओ बनावट असून, मॉर्फ केला असल्याने वाद रंगला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा इंटरनेट, सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांचा मुद्दा समोर आला असून, काहीजणांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनेही या बनावट व्हिडीओची दखल घेतली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

राजीव चंद्रशेखर यांनी रश्मिका मंदानाच्या बनावट व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. चुकीच्या माहितीचा हानीकारक प्रकार संबंधित प्लॅटफॉर्मद्वारे हाताळला जाणं आवश्यक असल्याची गरज राजीव चंद्रशेखर यांनी बोलून दाखवली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं आहे”.

https://x.com/AbhishekSay/status/1721088692675072009?s=20

अमिताभ बच्चन यांनी केली चिंता व्यक्त

रश्मिका मंदान्नाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.सिनेमात दोघांमध्ये चांगली बाँडिंग पाहायला मिळाली. आता अमिताभ यांनी रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओबाबत सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. एआयच्या डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका खरा वाटतो की एकदा पाहिल्यानंतर ती खरोखरं रश्मिकाच आहे असे वाटते.

नेमकं सत्य काय ?

या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी झारा पटेल आहे, ती एक ब्रिटिश-भारतीय मुलगी आहे. तिचे इंस्टाग्रामवर ४१५ K फॉलोअर्स आहेत. एआयच्या डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने रश्मिकाचा चेहरा या मुलीने बदलला होता. केलेले बदल इतके खरे दिसतात की तयार व्हिडिओ नक्की कोणता खरा आणि कोणता खोटा ते दिसत नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये