ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

मराठी नाट्यसृष्टी बहरली! ऑगस्टमध्ये नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

Upcoming Marathi Drama : मराठी मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. एकीकडे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे (Marathi Movies) प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. बॉक्स ऑफिसवर (Box Office) हे सिनेमे धुमाकूळ घालत आहेत.

दरम्यान, नवीकोरी नाटकंदेखील (Upcoming Marathi Drama) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहेत. ‘जर तरची गोष्ट’, ‘ब्रँड अॅम्बॅसेडर’, ‘किरकोळ नवरे’, ‘चाणक्य’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ ही नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. त्यामुळे एकप्रकारे मराठी नाट्यसृष्टी बहरली असल्याचे बोललं जात आहे.

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामतचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या 5 ऑगस्टला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य करणारं ‘किरकोळ नवरे’ हे नाटक 11 ऑगस्टला नाट्यरसिकांच्या भेटीला येणार आहे. याच महिन्यात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.आहे. याच वेळी ‘चाणक्य’ हे हिंदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे ऑगस्ट महिना नाट्यरसिकांसाठी मेजवाणी मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये