टेक गॅझेटदेश - विदेशमहाराष्ट्रशेत -शिवार

यूपीएल-म्हस्कोबा शुगरच्या करारातून नवी क्रांती

पुणे : यूपीएलने (UPL) तब्बल सात वर्षे केलेल्या संशोधनांमधून राबविलेल्या मशागत ते हार्वेस्टिंग पॅकेजच्या प्रणालीमधून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना तब्बल वीस टक्क्यांनी वाढ उतारा मिळणार आहे, यामध्ये शेतकर्‍यांना कापणीपासून ते पिक विम्यापर्यंत अनेक सुविधा मिळणार असल्याने ऊस उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये नवी क्रांती होऊ पाहत आहे. आज याबाबतची माहिती यूपीएल आणि म्हस्कोबा शुगरच्या प्रवर्तकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

यूपीएलने झेबा तंत्रज्ञान विकसित केले आहे. झेबा नैसर्गिक पद्धतीने उत्पन्न, स्टार्चवर आधारित, पूर्णपणे बायोडिग्रेडेबल, उत्कृष्ट शोषक आहे. इन-फरो अ‍ॅप्लिकेशनसाठी तयार करण्यात आलेले झेबा तंत्रज्ञान मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते, पिकांची मुळे जिथे असतात त्या भागात पोषक तत्त्वांच्या वापराच्या क्षमतेमध्ये सुधारणा करते आणि मातीच्या मायक्रोबायोमवर सकारात्मक प्रभाव निर्माण करते.
_पांडुरंग राऊत, अध्यक्ष, श्रीनाथ म्हस्कोबा शुगर मिल

‘शेतकरी सर्वप्रथम’ या दृष्टिकोनासह पर्यावरणानुकूल, शाश्वत शेती उत्पादने व उपाय, सुविधा प्रदान करणारी जागतिक स्तरावरील कंपनी यूपीएल लिमिटेडने उसाचे शाश्वत उत्पादन करण्यासाठी श्रीनाथ म्हस्कोबा शुगर मिलसोबत एक समझोता करार केला आहे. या करारांतर्गत शेतकर्‍यांच्या समस्या दूर केल्या जातील आणि नैसर्गिक संसाधनांचा इष्टतम उपयोग करीत सस्टेनेबल शुगर (पर्यावरणानुकूल साखर) ही कॅटेगरी निर्माण केली जाईल.

या सहयोगाच्या माध्यमातून आणि क्रांतिकारी झेबा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यूपीएलने १०,००० एकरांहून जास्त शेतीमध्ये उसाचे उत्पादन १५%ने वाढवण्याबरोबरीनेच कच्च्या मालावरील खर्चात घट करण्याचेदेखील उद्दिष्ट आखले आहे, यामुळे शेतकर्‍यांचा नफा आणि कमाई वाढेल. या अभियानामुळे ७० हून जास्त गावांमधील ४,००० पेक्षा जास्त शेतकर्‍यांना फायदा मिळेल.

साखर उद्योगक्षेत्रात पाणी, कच्चा माल, वीज, कामगार आणि इंधन यासारख्या अनेक संसाधनांची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. बराच जास्त वापर असूनदेखील प्रत्येक हितधारकाला त्यांच्या गुंतवणुकीवर मिळणारे लाभ मात्र कमी असतात. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. खराब पिके, गुंतवणूक खर्चात वाढ, कामगार न मिळणे, यांत्रिकीकरण, वीज आणि पाण्याची कमतरता, शेतीविषयी सल्ल्यामधील समस्या, पिकांची गॅरंटी न मिळणे इत्यादींमुळे तयार ऊस मिळण्यात उशीर होतो. याव्यतिरिक्त, एका बाजूला पर्यावरणानुकूल (इको-फ्रेंडली) साखरेची वाढती मागणी आणि दुसर्‍या बाजूला पाण्याचा अपव्यय, पोषण वाया जाणे, वीज खूप जास्त वापरली जाणे या चिंता देखील शेतकर्‍यांना भेडसावत असतात.

झेबा तंत्रज्ञानाच्या मदतीने ६०० कोटी लिटर पाणी आणि ५०० मेट्रिक टन युरियाची बचत करण्याचे युपीएलचे उद्दिष्ट आहे. २०२१ मध्ये उसाच्या शेतीसाठी उत्तर प्रदेशातील १० आणि महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये २५००० एकर शेतांमध्ये १२५०० शेतकर्‍यांनी झेबाचा वापर केला. यामुळे प्रचंड प्रभाव निर्माण झाला.

पिकांमध्ये ५०% वाढ झाली, पिकांचे प्रमाण दर एकरी सरासरी ३५-४० टनांपासून ५० ते ८० टनांपर्यंत वाढले. या करारानुसार उसाच्या पर्यावरणानुकूल, शाश्वत शेतीसाठी शेतकर्‍यांना शेतीविषयक चांगल्या पद्धती (जीएपी) विषयी सल्ला, प्रोनुटीवा (पिकांचे संपूर्ण संरक्षण व पोषण पॅकेज), प्लांटर्ससंदर्भात यांत्रिकीकरण, अर्थिंग अप मशिन्स व बूम स्पेयर्स, ऍपमार्फत विमा आणि ट्रेसेबिलिटीच्या शाश्वत सुविधा देखील प्रदान केल्या जातील.


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये