देश - विदेश

हाय हिल्स घालणं उर्फीला पडलं महागात, भररस्त्यात झाले असे काही, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या तोकड्या कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे फार कठीण आहे. अनेकदा तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र, यावेळी उर्वी जावेद चर्चेत आली ती तिच्या हाय हिल्समुळे.

उर्फी जावेद यावेळी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत आली नाही तर ती तिच्या हाय हिल्समुळे चर्चेत आली आहे. हे हाय हिल्स घालणं उर्फीला महागात पडलं आहे. उर्फी जावेद नवीन ड्रेसिंग स्टाईल करुन घराबाहेर पडली. उर्फीने पिंक कलरचा फॅन्सी वनपीस परिधान केला होता. ती तिच्या कारमधून बाहेर पडली. पण हटके डिझाइन असलेले हाय हिल्स घातल्यामुळे उर्फीला रस्त्यावरून चालता आले नाही. तिचा तोल गेला आणि ती पडता पडता वाचली. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात उर्फीचा पाय अडकला आणि ती भररस्त्यात पडली असती पण तिने स्वत:ला सांभाळले.

उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असे देखील दिसत आहे की, उर्फी जावेद फोटो काढताना फोनवर बोलणाऱ्या पापाराझीवर भडकली. ती थेट त्याचा फोन घेते आणि कामावर आहे. का सारखा कॉल करत आहे. कामावर असल्यावर कॉल करू नको, असं बोलून फोन कट करते. यावेळी उर्फी जावेद काही इज्जतच नाही असे बोलते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये