“मी रणवीर सिंगची दुसरी पत्नी…”, उर्फी जावेदचं खळबळजनक वक्तव्य!

मुंबई | Urfi Javed Reaction About Ranveer Singh – अभिनेत्री आणि माॅडेल उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळे चांगलीच प्रसिद्धी झोतात आली आहे. मात्र तिला अनेकदा तिच्या फॅशन स्टाइलमुळे ट्रोल केलं जातं. नुकतंच उर्फीनं रणवीर सिंगबाबत एक वक्तव्य केलं असून ते चांगलंच चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ‘काॅफी विथ करण’ या कार्यक्रमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंगने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात करण जोहर आलिया आणि रणवीरसोबत रॅपिड फायर राऊंड खेळला होता. यावेळी करणने रणवीरला इतर कलाकारांच्या फॅशन सेन्सबद्दल प्रश्न उपस्थित केले. एकदा वापरलेले कपडे पुन्हा न वापरणारा कलाकार कोणता? असा प्रश्न करणने रणवीरला विचारला. त्यावर रणवीरने एकही क्षण न घालवता लगेचच उर्फी जावेदचे नाव घेतलं होतं. त्यानं यावेळी उर्फीच्या फॅशन सेन्सचं कौतुक देखील केलं होतं.
आता उर्फी जावेदनं रणवीरच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं थेट रणवीरला लग्नासाठी प्रपोज केलं आहे. रणवीरबाबत बोलताना उर्फी म्हणाली, “मी रणवीरवर प्रेम करते. तसं तर दीपिकानंतर त्याला कधी याची गरज भासणार नाही. पण त्याला जर कधी दुसरं लग्न करायचं असेल तर मी त्याची दुसरी पत्नी होण्यासाठी तयार आहे. मला असं करायला आवडेल.” तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.