मुंबई | Urfi Javed – भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाद सुरू आहे. चित्रा वाघ उर्फी जावेदच्या कपड्यांवरून आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसंच महिला आयोग उर्फीवर कारवाई का करत नाही? असा सवालही चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकरांना (Rupali Chakankar) विचारला आहे. त्यामुळे चाकणकर आणि वाघ यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. या दरम्यान, आज (13 जानेवारी) उर्फी रूपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उर्फी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकरांची भेट घेणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फीला सार्वजनिक ठिकाणी थोबाड फोडणार असल्याची धमकी दिली होती. त्याप्रकरणी उर्फी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची भेट घेणार असून वाघ यांनी मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
नेमकं काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
“उर्फी समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, तिचं थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरुच ठेवला तर तिचं थोबाड फोडणार”, अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती.
View Comments (0)