ऋषभ-उर्वशीची अधुरी कहाणी मोठ्या पडद्यावर; ‘तौबा मेरी तौबा’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे जवळचे नाते आहे. अनेक अभिनेत्रींनी भारतीय संघातील क्रिकेटपटूंशी लग्न केले आहेत. तर काहींच्या अफेअरच्या चर्चा कायम होत्या. आता अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्यात असलेल्या अफेअरची चर्चा वेगळी सांगायला नको. उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली तरी त्या पोस्टला ऋषभ पंतशी जोडली जाते. आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे. ऋषभसोबतची अधुरी कहाणी उर्वशी मोठ्या पडद्यावर आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे उर्वशीच्या नवीन पोस्टमुळे ऋषभसोबतची अधुरी कहाणी उर्वशी मोठ्या पडद्यावर आणणार असल्याच म्हटल जात आहे.
उर्वशीचं ‘तौबा मेरी तौबा’ हे गाणं काल 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालं. यामध्ये तिच्यासोबत छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता शरद मल्होत्रा झळकला आहे. शरदसोबतचा फोटो पोस्ट करत उर्वशीने या गाण्याविषयी माहिती देखील दिली होती. या गाण्यात उर्वशी फिकट हिरव्या रंगाच्या साडीत ठुमकताना दिसत आहे. तिच्या अधुऱ्या लव्ह स्टोरीच दुख व्यक्त करताना दिसत आहे. याच पोस्टवरून पुन्हा एकदा ऋषभसोबतच्या तिच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.
‘तौबा मेरी तौबा’ हे गाणं प्रदर्शित येण्यापूर्वीच त्याविषयीचे अंदाज वर्तवले जात होते. हे गाणं उर्वशी आणि ऋषभच्या अधुऱ्या लव्ह-स्टोरीवरच आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. उर्वशीच्या कॅप्शनमुळेच या चर्चांना उधाण आलं आहे. ‘खुद से भी ज्यादा सनम, हमने तुमसे प्यार किया’, असं लिहित उर्वशीरने ही पोस्ट शेअर केली आहे.