देश - विदेश

26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यास अमेरिकी कोर्टाची मंजुरी

नवी दिल्ली : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात (26/11 terror attack) सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) भारतात परत आणण्यास यश आले आहे. अमेरिकेतील फेडरल कोर्टाने (US court) पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा (Tahawwur Rana, a Canadian businessman of Pakistani descent) याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास सहमती (extradition of Tahawwur Rana to India) दर्शवली आहे. भारताने सुरुवातीला 10 जून 2020 रोजी राणाच्या प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची तक्रार दाखल केली होती, ही विनंती बाइडेन प्रशासनाने मंजूर केली होती. (US court has approved the extradition of Tahawwur Rana to India, for his involvement in the 2008 Mumbai terror attacks)

यूएस मॅजिस्ट्रेट न्यायाधीश जॅकलिन चुलजियन (US Magistrate Judge Jacqueline Chooljian) यांनी भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार (India-US extradition treaty) संबंधित पत्रक जाहीर केले आहे. प्रत्यार्पणाचा निर्णय पंतप्रधान मोदींच्या वॉशिंग्टन डीसीच्या नियोजित भेटीच्या एक महिन्यापूर्वी आला आहे.

तहव्वूर राणावर त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली (David Headley), ज्याला “दाऊद गिलानी” (dawood gilani) म्हणून ओळखले जाते त्याला माहिती पुरवल्याचा आरोप आहे. डेव्हिड मुंबईतील लष्कर दहशतवादी हल्ल्यांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत सहभागी होता.

दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण कराराच्या आधारे राणाला भारताकडे प्रत्यार्पण करावे, असे न्यायालयाने 48 पानांच्या आदेशात म्हटले आहे. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या सर्व संबंधित कागदपत्रांचे आणि युक्तिवादांचे पुनरावलोकन केल्यानंतर, न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाचे प्रमाणित केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये