धक्कादायक! औषधाच्या गोळीतून ब्लेड गिळायला देऊन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न
पुणे | शहरात महिला अत्याचाराच्या घटना सुरूच असून, वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल होत आहेत. अशातच कौटुंबिक वादातून औषधी गोळीतून पत्नीला ब्लेड खाऊ घालून तिची हत्या करण्याचा केल्याचा प्रकार पुण्यातील उत्तम नगर येथे उघकडीस आला आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ साधू सपकाळ (वय 45) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत छाया सोमनाथ सपकाळ (वय 42) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमनाथ पत्नी छाया हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे तो तिच्याशी कायम वाद घालून तिला मारहाण करून तिचा छळ करत होता. काही महिन्यांपूर्वी सोमनाथचा भाऊ घरी दारू प्यायला होता. यावरून छायाने सोमनाथला जाब विचारला. तसेच त्याला घरी दारू प्यायला बोलावू नका, असे ठणकावून सांगितले. या कारणावरून सोमनाथ चिडला आणि या कारणावरून छायाशी वाद देखील घातला.
सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळल्याने त्याने पत्नी छायाला जीवे मारण्याचा कट रचला. त्याने ओैषधी गोळ्यात ब्लेड टाकून त्या गोळ्या पत्नी छाया हिला खायला दिल्या. ब्लेड गिळाल्याने त्यांना त्रास झाला. त्यांनी याबाबत थेट पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.