17 दिवसांनंतर 41 कामगार बाहेर येणार; रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात
Uttarkashi Tunnel Rescue : 12 नोव्हेंबरपासून उत्तरकाशी (Uttarkashi) येथील सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) तब्बल 41 कामगार अडकून पडले आहेत. तर या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आत हे रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे 17 दिवसांपासून अडकून पडलेल्या कामगारांची आता सुटका होणार आहे.
दिवसरात्र मजुरांच्या सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आता हे रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यामध्ये 800 मिमी व्यासाची पाईप सोडण्यात आली आहे. तर या पाईपमधून NDRF ची टीम मजुरांपर्यंत पोहोचली आहे. या पाईपद्वारे आता मजुरांची सुटका करण्यात येणार आहे.
अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगद्यात रूग्णवाहिका देखाल पाठवण्यात आल्या आहेत. तसंच सर्व मजुरांसाठी 41 बेड तयार करण्यात आले आहेत.