ताज्या बातम्यामनोरंजन

“आई-बाबा आता खूप झालं…”, वैशाली ठक्करच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

मुंबई | Vaishali Thakkar – अभिनेत्री वैशाली ठक्करनं (Vaishali Thakkar) काल (16 ऑक्टोबर) दुपारी 12.30 वाजता इंदौरमधील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. वैशाली ठक्करच्या आत्महत्येनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ती आपलं आयुष्य अशाप्रकारे संपवेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण एवढं गंभीर पाऊल तिनं का उचललं याचा उल्लेख तिच्या सुसाईड नोटमध्ये तिनं केला आहे. वैशालीनं लिहिलेल्या सुसाईड नोटमधून बरेच धक्कादायक खुलासे समोर आले आहे. तसंच या सुसाईड नोटमधून तिनं तिच्या आई-वडिलांसाठी मेसेज देखील दिला आहे.

वैशाली ठक्करनं आत्महत्येपूर्वी तिच्या आई-वडिलांसाठी एक नोट लिहिली होती. ही नोट पोलिसांनी जप्त केली होती आणि त्याचबरोबर तिची खासगी डायरीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. वैशालीने तिच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले असून यात तिने तिचा शेजारी राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

वैशालीने तिच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे की, “आई- बाबा आता खूप झालं… माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे आणि मलाही खूप त्रास झाला आहे. फक्त मला माहीत आहे की या 2 वर्षांमध्ये मी काय सहन केलं आहे आणि कशाविरुद्ध लढले आहे. राहुल नवलानीने माझ्याशी काय काय चुकीच्या गोष्टी केल्यात हे मी सांगूही शकत नाही. त्याने माझं मानसिक शोषण केलं आहे. माझा शारिरीक छळ केला आहे आणि अखेर त्यानं जसं मला सांगितलं होतं की तो माझं लग्न होऊ देणार नाही हे शेवटी त्यानं केलंच.”

“आता तुमची मुलगीच राहणार नाही तर तिच्याशी संबंधित समस्याही राहणार नाहीत. मी आता सगळं संपवतेय आई. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पण मला माफ करा मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही. तुम्ही राहुल आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा द्या. त्यांनी माझा मागची दोन अडीच वर्षे छळ केला आहे. तुम्ही त्यांना शिक्षा द्या नाही तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही खुश राहा. मितेशला मला माफ करण्यास सांगा. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. – वैशाली ठक्कर”, असं तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये