रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या अध्यक्षपदी वैशंपायन

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या अध्यक्षपदी रो. योगिता वैशंपायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचा २०२२-२३ चा पदग्रहण सोहळा पार पडला. रो. योगिता वैशंपायन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे मावळते अध्यक्ष रो. विनय पाटील यांच्याकडून स्वीकारली. रो. रागिणी शाह यांनी सचिवपदाची सूत्रे मावळते सचिव नीलेश शिंदे यांच्याकडून स्वीकारली. तसेच २०२२-२३ सालच्या संचालक मंडळातील सदस्यांनीदेखील पदभार स्वीकारला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी २०२३-२४ च्या प्रांतपाल रो. मंजू फडके उपस्थित होत्या. रोटरी प्रांत ३१३१ मधील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट नवीन रोटरी वर्षात १०-१५ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक निर्मूलनासाठी जागृतीचे विशेष कार्य करणार आहे. आदिवासी, भटकी जमात व ऊसतोडणी कामगार यांच्यासाठी हॅपी फॅमिली कीटचेदेखील वाटप करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने बायोगॅस स्टोव्हचा समावेश आहे.