Rose Day : ‘रोझ डे’ च्या पार्श्वभूमीवर प्रेमी युगुलांच्या खिशाला झळ; गुलाबाच्या किमतीत दुपटीने वाढ

Mumbai | प्रत्येक महिन्याचे स्वतःचे विशेष महत्त्व असले तरी फेब्रुवारीबद्दल बोलायचे झाले तर बहुतेक तरुण रसिक मंडळी त्याचीच वाट पाहत असतात. काहींना व्यक्त व्हायच असतं, तर काहींना कबुली द्यायची असते. दुसरीकडे, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा काळ पूर्णपणे भेटवस्तूंसाठी आहे. यादरम्यान, प्रियकर आणि प्रेयसी चंद्र तोडण्यापर्यंत आश्वासनांवर स्वार होत असतात.
आज आपण गुलाबाच्या फुलांबद्दल बोलणार आहोत. खरंतर गुलाबाची खरी किंमत प्रेम करणाऱ्यांनाच कळते. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारी रोजी रोझ डे (Rose Day) ने होते. या दिवशी प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. पण यंदा मात्र या उत्सवावर महागाईचे सावट आहे. महागाईच्या झळा यंदा ही प्रेमवीरांना बसणार आहे. संपूर्ण भारतात अचानक फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे किंमती भडकल्या आहेत. विशेषतः गुलाबाच्या किंमती (Rose Price) वाढल्या आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यामुळे सजावट करणाऱ्या फुलांचीही मागणी वाढली आहे. भारतात जोरदार थंडी असल्यामुळे फुलांचे उत्पादन कमीच राहिले. त्यामुळे गुलाब आणि इतर सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांच्या किंमतीत जोरदार वाढ (Flower Price Hike) झाली आहे.
गुलाबाचे एक फुल साधारणपणे 4 वा 5 रुपयांना मिळते. पण आता लग्न सोहळा आणि व्हॅलेंटाईन आठवड्याने मागणी वाढली. आता एका गुलाबाच्या फुलासाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहे. हा भाव या आठवड्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुलाबाव्यतिरिक्त जरबेराचा घड 30 ते 40 रुपयांपर्यंत मिळत होता. आता हा घड 60 रुपयांना मिळेल. तर सजावटीच्या झेंडूच्या किंमतीही वाढल्या आहेत. आता झेंडूचा घड 200 ते 300 रुपयांना मिळत आहे.
बाजारात फुलांनाही पर्याय मिळाला आहे. प्लास्टिक आणि कागदी फुलांचीही रेलचेल दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते चिंतेत आहे. जास्त भावामुळे काही जण प्लास्टिक अथवा कागदी आणि नवीन आर्टिफिशिअल फुलांचा उपयोग वाढू शकतो. त्याचा फटका शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांना बसत आहे.