उखाणा घ्यावा तर असा! वनिताच्या उखाण्यात दडलंय मालिकेच नाव, “तूच माझा महाराष्ट्र…”

मुंबई | सोशल मीडियावर सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat Wedding) हिच्या विवाहाची चर्चा जोरात सुरू आहे. वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्न गाठ बांधली. काही दिवसांपासून त्यांच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्यातील फोटो देखील जोरात व्हायरल होताना दिसत होते. आता लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ विशेष चर्चेत आलाय. हा व्हिडिओ आहे, वनितानं घेतलेल्या उखाण्याचा. वनितानं भन्नाट उखाणा घेत सुमितचं नाव सर्वांना ऐकवलं. असाच एक व्हिडिओ विशेष चर्चेत आलाय. हा व्हिडिओ आहे, वनितानं घेतलेल्या उखाण्याचा. वनितानं भन्नाट उखाणा घेत सुमितचं नाव सर्वांना ऐकवलं.

काय आहे वनिताचा हा उखाणा?

‘टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा, टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा… सुमित, तूच माझा महाराष्ट्र आणि तूच माझी हास्यजत्रा’.वनितानं घेतलेला हा उखाणा सगळ्यांनाच आवडला. व्वा..व्वा ..वा म्हणत सगळ्यांनीच जल्लोष केलाय. हा व्हिडिओ सध्या विशेष चर्चेत आलाय.

Dnyaneshwar: