महाराष्ट्र

 दिंडीतील वारकऱ्यांना मिळणार २४ तास आरोग्य सेवा

 त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी एकादशी पायी दिंडी सोहळ्यात आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि मविप्र रुग्णालयाचे सुसज्ज आरोग्य पथक पंढरपूरपर्यंत आरोग्य सेवा देणार असल्याची माहिती मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस  ॲड.नितीन ठाकरे यांनी दिली     

हेही वाचा- सासवड एस. टी. आगाराने राबवले विद्यार्थिनींचे मोफत पास वितरण अभियान

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यातील हजारो संत , वारकरी आणि भाविकांना यंदाही आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने यंदाही आरोग्य सुविधा पुरवली जाणार आहे. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व  सर्व पदाधिकारी आणि संचालक व शिक्षणाधिकारी डॉ ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या सहकार्याने यंदाही दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मविप्र रुग्णालयाचे आरोग्य पथक २४ तास वारीमध्ये कार्यरत राहणार आहेत.  एकूण चार पथकांमध्ये १७ प्रशिक्षित डॉक्टर,  रुग्ण सहायक, रुग्णवाहिका चालक, औषधे, प्रथमोपचार सेवा उपलब्ध राहणार आहेत.

हेही वाचा- वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा आनंदी; खेडमध्ये पेरणीच्या कामांना वेग

त्र्यंबकेश्वर ते  पंढरपूर यादरम्यान वैद्यकीय सेवा देणाऱ्या  रुग्णवाहिकेचे पूजन शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे , अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी केले व आषाढी एकादशी वारीतील वारकऱ्यांना २४ तास आरोग्य सेवा देऊन वारकऱ्यांचे आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले.  यावेळी कम्युनिटी मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. बालाजी अलमले, इंटर्नशिप इंचार्ज डॉ. सुनिता पवार, सांस्कृतिक समितीचे प्रमुख  प्रा. मिलिंद देशपांडे, डॉ. कुशल शुक्ल, वित्त अधिकारी  सुजय ढेरिंगे, ट्रान्सपोर्ट विभागाचे किशोर गायकवाड, वाहनचालक बाळासाहेब जाधव, सहायक सेवक गौरव ढिकले पथकातील डॉक्टर व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये