मुंबई : (Varun Sardesai On Ashish Shelar) आज मुंबई, ठाण्यासह राज्यभर दहीहंडीचा उत्साह पार पडला. यावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप, टिका-टिपनी, टोले हे सर्व पहायला मिळाले. ठाण्यात टेंभी नाका येथील दहीहंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली तर दुसरीकडे युवासेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही मुंबईत वरळीसह भायखळा येथे आयोजित दहीहंडीमध्ये हजेरी लावली.
दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी दहीहंडी आयोजित करण्यासाठी वरळीतील जांबोरी मैदानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, वरळीत भाजपनं एका दिवसाचा इव्हेंट केला आहे, त्याचा राजकारणावर काही फरक पडत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
युवा सेना तर्फे दादर येथे निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात युवा सेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. जांबोरी मैदानात भाजपनं एक दिवस इव्हेंट केल्यानं फरक पडत नाही असं सरदेसाई म्हणाले. आमदार राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र या सर्व अफवा असल्याचे वरुण सरदेसाईंनी सांगितले.