ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मनसेवर नाराज वसंत मोरे राहणार की जाणार? तातडीनं मुंबईला रवाना झाल्यामुळे चर्चेला उधान!

मुंबई : (Vasant More Meet Amit Thackeray) मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे आक्रमक आणि विकसनशिल नेता म्हणून ओळख निर्माण करणारे आणि राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे वसंत मोरे कुठे तरी मागे पडताना दिसत आहेत. त्यातच आता त्यांनी पक्षाच्या पुणे शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर ऊघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा पुण्याच्या चौका-चौकात रंगताना दिसत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी मोरे गटाचे मनसेचे माथाडी कामगार सेना पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर मोरेंनी स्पष्ट आपली नाराजी माध्यमासमोर बोलून दाखवली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट पक्षात येण्याची आॅफर दिल्यामुळे मोरे मनसेला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीत सामील होणार या प्रकारच्या चर्चेला उधान आलं होतं. त्यामुळे पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडणार? यासाठी राजकिय जानकरांच्या भूवया उंचावल्याचे दिसून आले.

या नाराजीच्या घडामोडीत आता विद्यार्थी मनसे सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीच या प्रकरणाची थेट दखल घेतली आहे. त्यामुळे मोरे आज ताबडतोब मुंबईला रवाना झाले आहेत. या बैठकीतून काही मार्ग मिळते का? आणि अमित ठाकरे वसंत मोरे यांची नाराजी दुर करण्यात यशस्वी होतात का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याकडे संपुर्ण पुण्यातील मनसैनिकांचे लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये