फडणवीसांविरोधातील याचिकेचा आज निकाल

मुंबई | Devendra Fadnavis – २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप करीत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ५ सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून, आज शुक्रवार ८ सप्टेंबरला तो जाहीर केला जाणार आहे.
यासंदर्भात ॲड. सतीश उके यांनी या प्रकरणात फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे.
दरम्यान, यापेक्षाही गंभीर गुन्ह्यांची नोंद प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे. पण केवळ नजरचुकीने दोन गुन्ह्यांचा उल्लेख करण्याचे राहून गेले, असा युक्तिवाद फडणवीसांच्या वकिलांनी केला होता. आता न्यायालयाने निकालाची तारीख ८ सप्टेंबर ठरवली आहे. त्यामुळे उद्या न्यायालयाचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.