ताज्या बातम्यामनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास

Ravindra Berde Passed Away | ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचं निधन झालं आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला मोठा धोक्का बसला असून संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळी पसरली आहे. रवींद्र बेर्डे हे 78 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगानं त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर रूग्णालयात उपाचार सुरू होते.

रवींद्र बेर्डे यांना दोन दिवसांपूर्वीच रूग्णालयातून घरी आणलं होतं. मात्र, अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. रवीद्र बेर्डे यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतून आणि त्यांच्या चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. तसंच त्यांनी अनेक मराठी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हमाल दे धमाल, हाच सुनबाईचा भाऊ, उचला रे उचला, खतरनाक अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

मराठी सिनेसृष्टीसोबतच रवींद्र बेर्डेंनी हिंदी सिनेसृष्टीत देखील त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी सिंघम, चिंगी या चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये