दोन वर्षांपूर्वी झालं होतं कॅन्सरचं निदान अन् आता कोरोनाची लागण, ज्येष्ठ अभिनेत्रीनं ट्विट करत दिली माहिती
मुंबई | Kirron Kher – बाॅलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर (Kirron Kher) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती किरण खेर यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे. किरण यांना दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरचं निदान झालं होतं. अशातच आता त्यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत.
किरण खेर यांनी ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्या,” असं ट्विट किरण यांनी केलं आहे. त्यांनी हे ट्विट शेअर करताच त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, किरण खेर यांना 2021 मध्ये मल्टिपल मायलोमा (रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार) असल्याचं निदान झालं होतं. ही बातमी त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावरून दिली होती. तसंच किरण कॅन्सर रुग्ण आहेत, अशातच त्यांना कोरोना झाल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.