“नितीन गडकरींचा काटा काढण्याचा प्रयत्न होतोय…”, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबई | Vijay Wadettiwar – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक दावा केला आहे. कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विजय वडेट्टीवारांनी केलेल्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
विजय वडेट्टीवर यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना गंभीर आरोप केले आहेत. यावेळी ते म्हणाले की, दोन गोष्टींसाठी कॅगचा रिपोर्ट महत्त्वाचा आहे. एक भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून आणि दुसरा नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वपर होत आहे.
नितीन गडकरी यांची प्रतिमा स्वच्छ आणि चांगली असल्याचं सर्वजण सांगतात. तसंच त्यांची प्रतिमा ही स्वच्छ आणि विकासाची आहे. म्हणूनच नितीन गडकरींना बाजूला करून त्यांचं राजकारण संपवायचं हे एक कारण असू शकतं. कॅगचा भ्रष्टाचार आता समोर आला आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.