“…अन् तीन पक्षाचं रूपांतर विदर्भातील खड्या तमाश्यात होणार” वडेट्टीवारांची सरकारवर जहरी
मुंबई : (Vijay Wadettiwar On Bharat Gogawale) काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत तिखट शब्दात सरकारवर हल्लाबोल केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, सरकारमध्ये तीन तिघाडा आणि काम बिघाडा आहे. कोण काय बोलतं ? कोण काय शोध लावतं? कोण कसे कमेंट करतो? कोण कोणावर कुरघोडी करतो? कोण बायकोला सोडेल म्हणून सांगतो, कोणी असं सांगतो की माझी बायको आत्महत्या करेल… म्हणून मंत्रीपद द्या… या सगळ्या विचित्रपणाला राज्यातील जनता वैतागली आहे.
पुढे ते म्हणाले, आजपर्यंत हे नाटक होतं…आता नाटकाचे रूपांतर तमाशात होतंय… आणि तीन पक्षाचं रूपांतर विदर्भातील खड्या तमाश्यात होणार, मग कोणीतरी तुतारी वाजवेल…कोणी तरी नाच्याची भूमिका स्वीकारेल…कोणी तरी पायाला गुगरू बांधून नाचेल. हा तमाशा महाराष्ट्रातील लोकांना दिसणार, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारवर जहरी टीका केली आहे.