शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने घेतला गळफास

बीड | Vinayak Mete : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन मेटे (Sachin Mete) यांनं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. तो 34 वर्षांचा होता. सचिन मेटेच्या आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

सचिन मेटे हा विनायक मेटे यांचे बंधू त्रिंबक मेटे यांचा मुलगा होता. सचिननं आज राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तसंच त्यानं आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केली आहे याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे. तसंच आता ते पुढील तपास करत आहेत.

सचिने मेटेनं अचानक हे टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास पोलीस करत आहेत. तसंच या आत्महत्येमागे काही कारणं आहेत का याची देखील चौकशी पोलीस करणार आहेत.

दरम्यान, विनायक मेटे हे शिवसंग्राम या मराठा संघटनेचे नेते होते. 14 ऑगस्ट 2022 रोजी त्यांंचं अपघातात निधन झालं होतं. तर आता सचिन मेटे याच्या आत्महत्येनं मेटे कुटुंबीयावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Sumitra nalawade: