Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी
“एकनाथ शिंदेंचा आम्हाला आदर पण आमच्या मनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच”

मुंबई – आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री असल्याचं शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील वाय. बी. चव्हाण केंद्रात विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
दरम्यान, गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार गेल्या सरकारने केला. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम मागील सरकारने केले. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस असल्याचंही मेटे म्हणाले.