राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार! शिंदे गट स्वगृही परतणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा
मुंबई : (Vinayak Raut On Eknath Shinde Group) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात परतण्यासाठी शिंदे गटातील अनेकांचे मातोश्रीवर फोन आणि निरोप येत आहेत. लोकसभेपूर्वी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार, असा खळबळजनक दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह देशात इंडिया आघाडीलाच मोठं यश मिळेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विनायक राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेतील गद्दारांनी उद्धव ठाकरे यांना शहाणपण शिकवू नये, २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह देशात इंडिया आघाडीलाच मोठं यश मिळेल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला
‘राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार’
मराठा आणि ओबीसी यांच्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहेत. त्यांना दोन्ही समाज धडा शिकवेल, अशी टीकाही राऊत यांनी केली. इतकंच नाही, तर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्यांपैकी अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. लोकसभेपूर्वी शिवसेनेते मोठा भूकंप होईल, असा दावाही त्यांनी केला.