मुंबई : (Vinayak Raut On Shahaji patil) दोन महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केली आणि कधीही भरुन निघेल की, नाही असं मोठं भगदाड सेनेला पाडलं. यानंतर अनेकांनी शिवसेनेला तारण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचे पहायला मिळाले. काही दिवसांपुर्वी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आलं.
दरम्यान, त्याचे कारणही तसेच आहे, मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रचारात अंधारे यांनी शिवसेनेसह, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर सडकून टिका केली होती. त्याच सुषमा अधारेंनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाय त्याबदल्यात त्यांना सेनेचे महत्त्वाचे उपनेत्या पदही देण्यात आलं आहे.
दरम्यान, या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समर्थन दर्शवलं आहे. त्यामुळे संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे असे मोठे विधान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. राऊत सध्या सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.